
माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील लक्ष्मीनगर परिसरात एका बिअर बार व मोटार रिवायंडींग दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे तीन लाखांहून अधिक रक्कम व माल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अक्षय मोहन दबडे (वय 27, व्यवसाय – हॉटेल व अक्षय बार, रा. लक्ष्मीनगर, करगणी) यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २ जून रोजी रात्री १०.३० ते ३ जून रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली. चोरट्यांनी प्रथम अक्षय बिअर बार अँड परमिट रूमचे चैनल गेट तोडून आत प्रवेश केला, त्यानंतर लगेचच शेजारील श्री ज्योतिर्लिंग मोटार रिवायंडींग दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करत मोठ्या प्रमाणात चोरी केली.
चोरीस गेलेल्या मालात सुमारे ३ लाख रुपये रोख रक्कम, ३ हजार रुपयांचे चिल्लर, ५५,२२५ रुपयांचे दारूचे बॉक्स, २२,७०० रुपयांचा रिवायंडींग दुकानातील माल अशा एकूण ३.८० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच पीएसआय श्री. केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा तपास सुरू असून अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेमुळे करगणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.
#आटपाडीचोरी #LawAndOrder #MandeshiCrimeAlert #बिअरबारचोरी #RewindingShopTheft #CrimeNews #PoliceAlert #MaharashtraCrime #दैनिकमाणदेश #Lokshahiवाचवा