माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्याच्या आर्थिक क्षेत्रामध्ये प्रमुख असलेल्या दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेची आज सर्व साधारण विशेष सभा आटपाडी एज्युकेशनच्या “जिम्नॅस्टिक हॉल” येथे आज दिनांक ०२ रोजी सकाळी १०.०० आयोजित करण्यात आली असून या सभेला सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन दादासाहेब पाटील यांनी केले आहे.
सभेपुढील विषय
१) मागील दि. ०३/०९/२०२३ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२) संचालक मंडळाने सुचविलेल्या बँकेच्या पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे.
३) मा. अध्यक्षांचे परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयंवर चर्चा करणे.
वरील विषय सभेपुढे मांडण्यात येणार आहेत. गणपूर्ती अभावी सभा तहकूब झालेस ती सभा एका तासानंतर त्याच दिवशी, त्याच ठिकाणी त्याच विषयांवर घेणेत येईल व या सभेस गणपुर्तीचे बंधन असणार नाही.