आटपाडीताज्या बातम्या

आटपाडी : शेटफळेतील अपघात प्रकरणी डमडम चालकावर गुन्हा दाखल

पाच दिवसांपूर्वीच सतीश भगवान गायकवाड यांच्या चायनीजच्या गाड्यावर आचारी काम करण्यासाठी सुरेंद्र सिंग (वय 37) रा. बिहार हा आला होता.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे दिनांक 31/05/2024 रोजी दुचाकी व डमडम यांच्यात झालेल्या अपघाता मध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता डमडम चालका विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

शेटफळे ता.आटपाडी येथे गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वीच सतीश भगवान गायकवाड यांच्या चायनीजच्या गाड्यावर आचारी काम करण्यासाठी सुरेंद्र सिंग (वय 37) रा. बिहार हा आला होता. दिनांक ३१ रोजी सायंकाळीच्या दरम्यान, गाड्यावरून काम करून तो मालक सतीश गायकवाड यांच्या घरी आंघोळ करण्यासाठी दुचाकीवरून घराकडे निघाला असता गाड्यापासून अवघ्या १०० ते १०० मीटर अंतरावर त्याच्या दुचाकीची धडक डमडमला बसली.

धडक इतकी जोरदार होती की, त्यामध्ये जागी तो रक्ताच्या धारोळ्यात पडला. अपघाता नंतर त्याला तातडीने आटपाडी येथे पुढील उपचारासाठी नेण्यात येते होते. परंतु वाटेतच तो मयत झाला. याबाबत संतोष भगवान गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एम.एच.-45-7444 या डमडम वरील अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button