डंपर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने, पाठीमागील कार धडकल्या ; सांगली फाटा येथे अपघात

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज : कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा येथे महामार्गावर चौरंगी अपघातात झाला यात चारचाकी गाड्यांचा चक्काचूर होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. किरकोळ जखमी वगळता सुदैवाने जिवीतहानी टळली.

 

पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने डंपर चालला होता. महामार्गाचे काम सुरू असल्याने डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला. यावेळी पाठिमागून येणाऱ्या कारचालकांनेही सावधानता बाळगत ब्रेक लावला. पण भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दोन्ही गाड्यांना जोराची धडक दिली.

या धडकेमुळे दोन्ही कार पुढे थांबलेल्या डंपरला धडकल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही कारचे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने किरकोळ जखमी वगळता कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासापेक्षा अधिक वेळ ठप्प झाली होती.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here