आटपाडी तालुक्यात अंगणवाडी मदतनीस पदासाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
2392

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आटपाडी अंतर्गत एकूण 14 महसुली गावातील 28 अंगणवाडी मदतनिस यांची मानधनी पदे रिक्त आहेत. ही मानधनी पदे भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ता धारक पात्र स्त्री उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 29 ऑगस्ट 2024 ते 10 सप्टेंबर 2024 अखेर पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आटपाडी कार्यालयात साक्षांकित प्रतिसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आटपाडी चे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

 

अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्जदाराचे वय 10 सप्टेंबर 2024 रोजी 18 वर्षाच्या वर व 35 वर्षाच्या आत व विधवा उमेदवार यांच्याकरिता 40 वर्षे पर्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता 12 वी पास आवश्यक आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे. अपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास तो बाद केला जाईल व त्याबाबतची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

गावनिहाय अंगणवाडी मदतनिस पद रिक्त असलेले अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक पुढीलप्रमाणे – नगरपंचायत आटपाडी – सोमेश्वरनगर केंद्र क्रमांक 1, बालटेवस्ती केंद्र क्रमांक 3, लवटेवस्ती केंद्र क्रमांक 7, मायाक्कानगर केंद्र क्रमांक 45, जाधवमळा केंद्र क्रमांक 46, मनमोतीनगर केंद्र क्रमांक 47, मरगळेवस्ती केंद्र क्रमांक 2. माडगुळे – खंडोबामळा केंद्र क्रमांक 32. गळवेवाडी – शिवेचेटेक केंद्र क्रमांक 5, सातकीमळा केंद्र क्रमांक 6. उंबरगाव – दडसवाडी केंद्र क्रमांक 29, पिंपळमळा केंद्र क्रमांक 28. मुढेवाडी – काकडेवस्ती केंद्र क्रमांक 49. तडवळे – हुबालेवस्ती केंद्र क्रमांक 48, तळेवाडी – शिंदेवस्ती केंद्र क्रमांक 40. गोमेवाडी – जरगवस्ती केंद्र क्रमांक 13. काळेवाडी – बोडरेवस्ती केंद्र क्रमांक 41, दबडेरूपनरवस्ती केंद्र क्रमांक 43. नेलकरंजी – भोसलेनगर केंद्र क्रमांक 17, गुलालकी केंद्र क्रमांक 38. झरे – बेंदवस्ती केंद्र क्रमांक 9. घरनिकी – चिमाईमळा केंद्र क्रमांक 35. दिघंची – भक्तीचामळा केंद्र क्रमांक 20, PHC दिघांची केंद्र क्रमांक 24, ढोकमळा केंद्र क्रमांक 21, पुसावळेवस्ती केंद्र क्रमांक 22, काळापट्टा केंद्र क्रमांक 23. पुजारवाडी दि. – कुटेवस्ती केंद्र क्रमांक 27.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here