अनुष्का-विराट परदेशात होणार शिफ्ट? विराट कोहली त्याच्या निवृत्तीबद्दल बोलताना म्हणाला…

0
7

 

बॉलिवूडची नामवंत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली हे दोघेही पॉवर कपल आहेत, सतत प्रसिद्धीच्या झोतात असले तरी विराट-अनुष्काला त्यांचं खासगी आयुष्य प्रायव्हेट ठेवायला, जपायला आवडतं. त्यांच्या घरी नुकतंच दुसऱ्या छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. फेब्रुवारी महिन्यात अनुष्काने मुलाला, अकायला जन्म दिला. तिची डिलीव्हरी लंडनमध्ये झाली. त्यांची मोठी मुलगी वामिका आणि अकाय यांच्या प्रायव्हसीबाबतही अनुष्का-विराट दोघे दक्ष असून, त्यांचे फोटो न काढण्याची विनंती पापाराझींना त्यांनी केली आहे. आता याचदरम्यान अनुष्क-विराट यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ते दोघे लवकरच भारत सोडून परदेशात सेटल होऊ शकतात. नुकताच विराटचा एक व्हिडीओ व्हायरल झाली असून त्याच्या एका विधानाने चाहत्यांना बरंच दु:ख झालं आहे.

खरंतर, विराट कोहली त्याच्या निवृत्तीबद्दल बोलला. हे ऐकल्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला. ‘ एक खेळाडू म्हणून आमच्या करिअरला एक्सपायरी डेट असते. मी फक्त मागच्या दिशेने काम करत वाटचाल करत आहे. मी काही कायम स्वरूपी खेळू शकत नाही. मी जोपर्यंत खेळत आहे तोपर्यंत मी माझे सर्व काही देईन, झोकून देईन, पण एकदा माझा खेळ संपला की मी निघून जाईन, तु्म्ही मला काही काळ पाहू शकणार नाही’ असे विधान त्याने केले होते.

परदेशात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा

आता विराट कोहलीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, अनेक चाहते असा अंदाज वर्तवत आहेत की अनुष्का-विराट लवकरच आपल्या दोन मुलांसह परदेशात शिफ्ट होऊ शकतात. वामिका आणि अकाय यांच्या उत्तम संगोपनासाठी हे जोडपं भारत सोडून यूकेला जाऊन तिथे स्थायिक होणार आहेत, अशी चर्च सुरू आहे. त्यामुळे अनुष्का शर्मा लवकरच बॉलिवूडला कायमचा अलविदा करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा शेवटची दिसली होती, त्यामध्ये शाहरुख, कतरिनाची देखील प्रमुख भूमिका होती. मात्र त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर काम करताना दिसली नाही. तर मुलगा अकायचा जन्म झाल्यावर ती सोशल मीडियापासूनही दूरच आहे. बॉलिवूडच्या कोणत्याही पार्टीतही ती सध्या दिसत नाही. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अनुष्काने नमूद केलं होतं की मुलांच्या जन्मानंतर ती अभिनय करणं सोडून देईल. त्यातच आता विराट कोहलीच्या या विधानामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्या दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.