
आयएएस अधिकारी पुजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या अडचणी संपत नाहीत तोच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचे वादग्रस्त कारनामे उघड होण्याची मालिका सुरू झाली आहे. याआधी मनोरमा यांनी शेतकऱ्याला बंदूकीचा धाक दाखवून धमकावले होते. आता त्यांच्या अरेरावीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्या पोलिसांशी उर्मटपणे वर्तण करत असल्याच्या दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ 2022 मधला असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केलीय.
खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोच काम सुरू आहे. या कार्यासाठी असलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्या समोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू घातला. मेट्रोच्या अधिकार्यांनी याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कर्मचारी तिथे पोहचले. मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला. तो हा प्रसंग आहे.
खासगी ऑडीला अंबर दिवा, वरिष्ठांशी गैरवर्तण, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, नावात बदल अशी अनेक प्रकरणे पूजा खेडकरांच्या बाबतीत समोर आली आहेत. त्यामुळे यूपीएससी परिक्षेतील हलगर्जीपणे चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे देशातील सर्वात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या परिक्षेला डाग लागला आहे. सध्या पोलीस पूजा खेडकर यांच्या फरार आईवडिलांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून ते गायब आहेत. त्यांचे फोन देखील बंद असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.
पहा व्हिडीओ:
VIDEO| मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल #IASPoojaKhedkar #ManoramaKhedkar pic.twitter.com/QPjvBC37xl
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 16, 2024