गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपीला सोडणार नाही :देवेंद्र फडणवीस

पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना उडवले. या घटनेत एकातरुणाचा आणि तरुणीचा दुर्देवी अंत झाला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले मात्र 15 तासांच्या आत त्याला जामीन मिळाला. आता या प्रकरणात वेगळे वळण आले असून या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी दखल घेत पबचालक आणि अल्पवयीन आरोपीचे वडिलांना अटक केली आहे.

या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्ताची भेट घेतली. आणि या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. या प्रकरणी कोणताही निष्काळजीपणा चालणार नाही असे फडणवीस म्हणाले. तसेच या अपघाताप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही असे म्हटले आहे.

अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला हे धक्कादायक आहे. पोलीस पुन्हा वरचा न्यायालयात जातील.
राज्यात या प्रकरणामुळे जनतेत रोष व नाराजी आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अहवाल बाल न्यायमंडळाकडे दिला असून अल्पवयीन मुलावर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळाने जामीन दिला आहे. मात्र दिल्लीच्या निर्भयाकांड नंतर बाल हक्क मंडळामध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, 16 वर्षापेक्षा अधिक वयाचा मुलाला प्रौढ म्हणून संबोधले जाईल. तास अहवाल देखील दिला होता मात्र त्या आदेशाला बाजूला ठेवण्यात आले आणि त्याला जामीन दिला.

हा निर्णय धक्कादायक असून वरच्या कोर्टासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पबचालक आणि बार मालकाला अटक केली आहे. तर मुलाच्या वडिलांना देखील अटक केली आहे. बार आणि पबचा परवाना देखील सील केला आहे. या प्रकरणी पोलीस गंभीर असून आरोपीला सोडणार नाही अशा ठळक शब्दात त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button