रील बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तरुणीचा अश्लील डान्स; Viral Video पाहून तरुणाकडून कारवाईची मागणी

0
513

सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी रस्त्यावर डान्स करणाऱ्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ पाहणे ही काही नवीन गोष्ट नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सातत्याने व्हायरल झालेले पाहायला मिळते. आतापर्यंत अनेकदा आपण कधी दिल्ली मेट्रोमध्ये, तर कधी मुंबई लोकल ट्रेनमध्ये, शहरातील चौकात अशा अनेक ठिकाणी अनेक रील्सप्रेमींना डान्स करताना पाहिले आहे. अनेकदा हे नृत्यप्रेमी सामाजिक भान विसरून अश्लील डान्स करतानादेखील दिसतात; ज्यावर युजर्सही प्रचंड संताप व्यक्त करतात. दरम्यान, आता असाच एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक तरुणी डान्स करताना दिसत आहे.

हल्ली सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्याच प्रकारे आता रस्त्यावर, ट्रेनमध्ये, मोठमोठ्या कार्यालयांबाहेर कधी काय पाहायला मिळेल हेही सांगता येत नाही. हल्ली अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी कुठेही, कसेही रील्स बनविताना दिसतात. रील्स, डान्स, गाणी या सर्व गोष्टी पाहणे ठीक आहे; पण जेव्हा या गोष्टी अश्लील पद्धतीने दाखविल्या जातात, तेव्हा त्या गोष्टींना वेळीच आळा घालणे गरजेचे ठरते. सध्या व्हायरल होत असेलला हा व्हिडीओ चक्क ग्वाल्हेर जिल्हाधिकार कार्यालयाबाहेरचा असून, व्हिडीओतील तरुणी ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

नक्की काय घडले व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी काळ्या रंगाची साडी नेसून ग्वाल्हेर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यावर बेभान होऊन अश्लील नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्वाल्हेरमधील आकाश बरुआ या तरुण सामाजिक कार्यकर्त्याने ग्वाल्हेरच्या एसडीएमकडे तक्रार अर्ज सादर केला आणि त्या तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “अशा व्हिडीओंमुळे शहरातील ऐतिहासिक ठिकाणांचे नकारात्मक ब्रॅण्डिंग होते, तसेच यामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेशही जातो. कारण- मोठ्या संख्येने अनेक लोक अशा ठिकाणांना भेट देत असतात. अशा वेळी जर कोणी असे कृत्य करीत असेल, तर त्यामुळे त्या जागेचे आणि शहराचे नाव खराब होते”, अशी चिंतादेखील यावेळी त्या तरुणाने व्यक्त केली.

 

हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील @network10news या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज मिळाल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील दिल्ली मेट्रो, मुंबई लोकल, तसेच मरीन ड्राइव्हसारख्या ठिकाणीदेखील अनेक तरुणींनी अशा प्रकारचे अश्लील डान्स केले होते. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

पाहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C9UhPoYs_oa

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here