तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास यंदा चेन्नईची छत्री !

0
9

तुकारामांचा पालखी सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.श्री संत तुकाराम महाराजांच्या 339 व्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्यावतीने नवी छत्री बनविण्यात आली आहे.संस्थानसाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतलेली आहेही छत्री श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतली आहे.यासाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. या छत्रीवर हाताने संपूर्ण कारागिरी केलेली आहे. यामुळे यंदा पालखीसोहळ्यात ही छत्री लक्षवेधी ठरणार आहे.

ही छत्री रंगीत व आगळी वेगळी सुरेख पद्धतीने तयार केलेली असून अब्दागिरी, गरूड टक्के, रेशमी ध्वज पताका यांच्या समवेत भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.या छत्रीचे वैशिष्ट्य म्हणजे या छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हातकामाने केलेली आहे.इतर भागात सुरेख नक्षीकाम केलेले आहे. छत्रीसाठी लागणार्या काड्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनविलेल्या आहेत.लोखंडी तारा बसविलेल्या नाहीत.छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीचे एसएस लोखंडी भक्कम पाइपचा वापर करण्यात आला आहे.छत्रीच्यावर पितळी कळस बसवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here