अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर येथे एका पोलिस कॉन्स्टेबलला 12 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. अवैध मुरुम वाहतूक करणारा डम्पर पकडण्यात आला होता. या प्रकरणीत गुन्ह्यात नाव येऊ न देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यात 12 हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी स्विकारले होते. रक्कम स्वीकारताना पोलिस कॉन्स्टेबल रंगेहात पकडले गेले. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयाच्या परिसरातून डंप्पर चोरीला गेला होता. अवैद्य मुरुम वाहतुक केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली त्यानंतर डंप्पर पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांनी लाच मागिलती. गुन्ह्यात नाव येणार नाहीत याकरिता कॉन्स्टेबल यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने लाचलुचपत विभागानकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि कॉन्स्टेबल रघूनाथ यांना रंगेहात पकडले. कॉन्स्टेबलने श्रीरामपूर येथील एका निर्जन ठिकाणी बोलवून 12 हजार रुपयांचे पाकिट स्वीकारले होते. श्रीवास्तव यांनी कॉन्स्टेबल रघूनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रघुनाथ यांना अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत पोलिसांनी हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.