नव्या कोऱ्या फॉर्च्युनरवर लिहिलेली कविता चर्चेत

0
132

माणदेश एक्सप्रेस न्यूज|सोलापूर : फॉर्च्युनर ही कार केवळ एक वाहन न राहता, समाजात प्रतिष्ठेचे प्रतीक बनली आहे. मात्र, अलीकडेच पुण्यातील हगवणे प्रकरणामुळे या कारकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला आहे. हुंड्याच्या स्वरूपात फॉर्च्युनर घेतल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या या कारविषयी आता करमाळ्यातील एका युवकाने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे – तीही थेट गाडीवर कविता लिहून!

 

करमाळा तालुक्यातील अतुल खुपसे यांनी नुकतीच फॉर्च्युनर ही महागडी कार खरेदी केली आहे. मात्र गाडी घेऊन फिरताना अनेकांकडून “हुंड्यात घेतली का?” असा प्रश्न विचारला जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या कारच्या मागच्या बाजूसच एक सामाजिक संदेशासह कविता लिहून घेतली.

 

“तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी!
मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा,
हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा,
अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय,
पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु-धु धुतलय!”

 

ही कविता वाचून अनेकजण हसतात, काहीजण विचार करतात, तर काहीजण फोटो काढून सोशल मीडियावरही शेअर करत आहेत. अतुल खुपसे यांनी आपल्या शैलीत समाजात निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

 


पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हुंड्यात घेतलेल्या फॉर्च्युनर कारचा उल्लेख झाल्यामुळे या गाडीभोवती एक नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती. आता अनेकजण अशी गाडी बाळगताना समाजाच्या नजरेत उतरतोय, अशी भावना काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे.

 

अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनरबाबत समाजात निर्माण झालेली शंका दूर करण्यासाठी ही कविता लिहून घेतली. त्यांच्या या विनोदी व सामाजिक पद्धतीने मांडलेल्या प्रतिक्रियेमुळे या घटनेची चर्चा सध्या पंचक्रोशीत रंगली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here