लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

0
38

मुक्या प्राण्यांना अमानुष मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात आणखी नवीन एक व्हिडिओ समोर आला आहे. सोसायटीमधील लिफ्टमध्ये कुत्र्याला त्याचा वॉकरने मारहाण केली. ही घटना लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ३० जून रोजी ही घटना घडली आहे. लिफ्टमध्ये कोणी नसताना तरुणाने कुत्र्याला बेदम मारहाण केली आहे.

त्याचा वॉकर लिफ्टमधून घरी जात होते. त्यावेळी लिफ्टमध्ये कोणीच नसताना वॉकरने रागाच्या भरात कुत्र्याला पट्ट्याने मारले. ऐवढचं नव्हे तर त्याने अक्षर: कुत्र्याला फास लागेल अश्या पध्दतीने पकडलं. कुत्र्याला उचलून फेकले आणि त्याला शिवीगाळ देखील केली.

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्यांने सांगितले की, या तरुणांवर कारवाई झालीच पाहिजे. जर तुम्ही भाड्याने वॉकर घेत असाल तर कृपया त्यांचे बारकाईने निरिक्षण करा. प्राण्यांवरील अत्याचार अस्वीकार्य आहे. व्हायरल व्हिडिओला अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा अशी विनंती केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींचे मन दुखावले आहेत.

पहा व्हिडीओ:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here