महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होण्याची शक्यता दिसत आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेग लागलेला दिसतो. दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार याची घोषणा करत आहे. दरम्यान मुंबई पोलिस दलातील तडफदार व्यक्तिमत्त्व राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहले. त्यात विधानसभा निवडणूक लढणार अशी स्पष्टता दिसून येते. वर्सोवा विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याबाबत कोणतीही माहिती नाही. फेसबूकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्या पक्षाचा किंवा मतदार संघाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे राजकारणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता दिसत आहे.
आज पासून प्रचाराला सुरुवात केली अशी घोषणा त्यात केली आहे. वर्सोवा येथील झुलेलाल मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण प्रयत्न करू ‘ असं त्या पोस्ट मध्ये लिहले आहे. कोणाविरुध्द निवडणूक लढणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय पांडे हे बेकायदेशीरपणे फोन ट्रॅप केल्याप्रकरणी अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आले होते.