
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे : मावळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे, दूरदृष्टी असलेले, ध्येयवेडे नेतृत्व हरपल्याची भावना मावळ तालुक्यातून व्यक्त होत आहे. माजी आमदार आणि मावळ भूषण कृष्णराव धोंडिबा भेगडे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, आज मंगळवारी सकाळी त्यांच्या अंत्ययात्रेस त्यांच्या निवासस्थानापासून शोकाकुल वातावरणात सुरुवात झाली.
भेगडे यांचे मावळच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि अखेरचा निरोप देण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या अंत्ययात्रेला मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर, बापूसाहेब भेगडे, उद्योजक रामदास काकडे, रवींद्र भेगडे, गणेश खांडगे, चंद्रकांत शेटे, संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, गणेश भेगडे, किशोर भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, दीपक हुलावळे, बाबुराव वायकर, साहेबराव कारके, तुकाराम असवले, अर्चना घारे, काळूराम मालपोटे, तानाजी दाभाडे, चंद्रकांत काकडे, चंद्रजीत वाघमारे, अरुण माने, जयंत कदम, संदीप काकडे, डॉ. संभाजी मलघे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, दत्तात्रय पडवळ, किशोर राजश, बाळासाहेब शिंदे, यादवेंद्र खळदे, महादूबुवा कालेकर, संतोष परदेशी, शंकरराव शेळके, लक्ष्मण बालगुडे, वैशाली दाभाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
भेगडे यांच्या जाण्याने मावळने एक कणखर, अभ्यासू, आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.