ओयो हॉटेलच्या खोलीत आढळला एका जोडप्यांचा मृतदेह

0
17

उत्तर प्रदेशातील संभलमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओयो हॉटेलच्या खोलीत एका जोडप्यांचा मृतदेह सापडला आहे. तरुणाचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तर तरुणी बेडवर पडली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मोहल्ला फतेहुल्ला सराय येथील ओयो हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. मृत तरुण दिल्लीच्या गौतम नगर येथील रहिवासी होता तर तरुणी संभल येथील रहिवासी होती. गुरुवारी दुपारी दोघे ही ओयो हॉटेलमध्ये पोहोचले. एक दिवसासाठी रुम हवी असं सांगत हॉटेल मॅनेजरला ओळखपत्र दाखवून रुम मिळवला.

शुक्रवारी चेक आऊट न केल्यामुळे हॉटेल मॅनेजरने त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला.पण कोणीही प्रतिसाद न दिल्याने मॅनेजरला संशय निर्माण झाला. त्याने पायऱ्या चढून खिडकीतून पाहिले तर खोलिच्या आत दोघे ही मृतावस्थेत दिसले. या घटनेनंतर मॅनेजरने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाचा लटकलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह खाली काढला .

पहा व्हिडीओ:

https://twitter.com/sbhatnagar76/status/1804049354291900477


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here