बिहार मध्ये वैशाली जिल्ह्याच्या भगवानपुर परिसरामध्ये सोमवारी स्कॉर्पियोच्या धडकेत एका दांपत्याचा मृत्यू झालेला आहे. हाजीपुर-मुजफ्फरपुर राष्ट्रीय उच्च्पथ संख्या 22 वर जलद गतीने येणाऱ्या स्कॉर्पिओने शेतात काम करणाऱ्या दांपत्याला चिरडले. या घटनेमध्ये या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आह.
बिहार पोलिसांनी सांगितले की या अपघातानंतर चालक वाहन सुडून तिथून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले व पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले असून वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहे.