
सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील व्हिडीओ तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यात नवनवीन चित्रपटांमधील चर्चेत असलेली गाणी, डान्स स्टेप्स, डायलॉग यांवर अनेक जण रील्स बनवताना दिसतात. सध्या सगळीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट खूप चर्चेत असून यामध्ये बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. शिवाय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण भावूक झाले, ज्याचे विविध व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता ‘छावा’ चित्रपटाच्या बर्लिन येथील प्रीमियरमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये , एक चिमुकली ‘छावा’ चित्रपटाच्या बर्लिन येथील प्रीमियरमध्ये ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी चिमुकलीचा डान्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही कौतुक कराल. सध्या तिचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.
यावर आतापर्यंत साठ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत, तर एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.