नवी दिल्ली :स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ नव्या वर्षातील पहिली वनडे मालिका खेळण्यासाठी राजकोटच्या मैदानात उतरलाय. आयर्लंड महिला संघानं तीन सामन्यांच्या पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि आयर्लंड महिला संघामध्ये आतापर्यंत १२ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. या सर्व सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे आयर्लंड संघासाठी ही लढाई सोपी नसेल. दुसरीकडे भारतीय संघ आपला विजयी धमाका कायम ठेवत आपला विक्रम आणखी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल.
टीम इंडिया नव्या वर्षातील पहिला वनडे सामना जिंकून वर्षाची सुरुवात एकदम धमाक्यात करण्यासाठी उत्सुक असेल.