आटपाडी तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण सरगर,उपाध्यक्षपदी दिपक प्रक्षाळे

0
290

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्या वेळी लक्ष्मण सरगर, उपाध्यक्षपदी दिपक प्रक्षाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी 6 जानेवारी रोजी असणारा पत्रकार दिना साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जेष्ठ पत्रकार अच्युतराव गिड्डे, प्रशांत भंडारे, सूरज मुल्ला, नागेश गायकवाड, अमोल काटे, मुजंमिल तांबोळी, सुशांत कासार, विक्रम भिसे, सचिन कारंडे, सुरेश मोकाशी, सुधीर पाटील, शिवानंद क्षीरसागर, उपस्थित होते.

यावेळी सचिव म्हणून सदाशिव पुक्ळे, खजिनदार म्हणून नागेश गायकवाड यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी आटपाडी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यासाठी निवास्थान बांधणे, आरोग्य विषयक शिबिर राबवणे याबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षभरामध्ये अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी पत्रकारांच्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. पत्रकारांच्या पाठिशी राहत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.