माणदेश एक्सप्रेस न्युज:
सध्या अनेकजण नोकरी करतात, त्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अशा व्यक्तींसाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांचं हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहणारी मुलं नेहमीच घरगुती डब्याच्या शोधात असतात. जर तुम्ही योग्य बजेटमध्ये लोकांना चांगला आणि सकस आहार दिला तर हा बिझनेस तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशा काही बिझनेस आयडिया देणार आहोत, द्या अवघ्या १० हजार रूपयांपेक्षा कमी खर्चात तुम्ही सुरु करू शकता. या स्टार्टअप आयडिया तुम्हाला लाखोंची कमाई करून देऊ शकतात.
घरगुती डब्याची सेवा हा एक असा व्यवसाय आहे जो तुम्ही फक्त 10,000 रुपयांपासून सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीसह हा एक चांगला बिझनेस आहे. शिवाय या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
भारतीय लोकांच्या घरात आणि जेवणाच्या ताटात लोणच्याचा हमखास समावेश असतो. त्यामुळे लोणच्याचा बिझनेस हा देखील एक पर्याय आहे जो तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात सुरू करू शकता.