
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाढदिवस झरे येथील गेस्ट हाऊसवर विविध उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. सकाळी झरे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आटपाडी येथील श्री सेवा हॉस्पिटलच्या वतीने सर्व आजारावरील महात्मा फुले जनआरोग्य शिबीर घेण्यात आले. बनपुरी येथे मजूर फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष महादेव पाटील युवा मंचच्या वतीने बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या होते. बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या करण्यात आले.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या झरे येथे शुभेच्छा देण्याआठी विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष वैभव पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज संजय पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे,जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु.टी जाधव, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे सह-संयोजक विनायक पाटील, मजूर सहकारी फेडरेशनचे मणी उपाध्यक्ष महादेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई गायकवाड, हरिदास गायकवाड, आंबेवाडी चे युवा नेते नितेश पुजारी, विजय मेटकरी,जत भाजपाचे नेते डॉ.रवींद्र आरळी, संजय तेली, शिवानंद हाके, अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार नितेश राणे ,आम. महेश दादा लांडगे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक, आमदार संतोष दानवे, मोहन वानखंडे, आमदार जयकुमार गोरे, आम. अतुल भातकळकर,सतीश घाडगे आम.विजय देशमुख, आम. शेखर मुंदडा , माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पृथ्वीराज पवार, आम.सुरेश धस आम. निरंजन डावखरे, आम. प्रशांत ठाकूर, आम. प्रताप चिखलीकर, आम. मनीषा चौधरी, आम सुधीर घाडगे,आम. शहाजी बापू पाटील, आम. समाधान आवताडे, मुकुल देशमुख, आम.शंकर जगताप आम.मिहीर काटेजा,आम. संजय केळकर, आम. राम सातपुते, आम.अभिमन्यू पवार, आम.देवयानी फरांदे, सुरेश धस,आम. श्वेता महाले, सचिन कल्याण शेट्टी, आम. माधुरी मिसाळ, आम. सुभाष देशमुख, माजी आम. बळीराम शिरसकर, आम. मेघना बोर्डीकर, आम.आकाश फुंडकर, आम.राजेश पवार, नालासोपारा विधानसभा प्रमुख राजन नाईक, आम. प्रसाद लाड, माजी नगराध्यक्ष शितल तोंडलीकर, जळगावचे आम. चंद्रकांत पाटील यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


