वाहनाने धडक दिली अन तरुणी स्कुटीसह पुलाच्या पिलरवर पडली, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

0
488

 

उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 25 जवळ एक भीषण अपघात झाला आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला एका अज्ञात वाहनांची धडक लागली. या धडकेत तरुणी उंच पुलाच्या खांबावर पडली. ही घटना नोएडा सेक्टर 20 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली जेव्हा मुलगी तिच्या स्कूटरवरून जात होती आणि अचानक तिला अज्ञात वाहनाने धडक दिली.

या धडकेमुळे तिचा तोल गेला आणि ती थेट पुलाच्या पिलरवर पडली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी स्थानिकांनी तरुणीच्या मदतीसाठी धाव घेतला आहे. दोन जणांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आली आहे. सध्या मुलीच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

पहा व्हिडीओ: