लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार?काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? वाचा सविस्तर

0
17220

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार याची सध्या राज्यातील लाडक्या बहि‍णींमध्ये जोरदार चर्चा आहे. 19 सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल, असे सांगण्यात येत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा येथे बोलताना याविषयी महत्वाची माहिती दिली. या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याची माहिती दिली. तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिले. त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय कारनामे करत आहे, त्याचा पाढाच वाचला.

इतक्या खात्यात जमा झाली रक्कम

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली. आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले हे फसवी योजना आहे, हा निवडणुकीचा जुमला आहे. पण आतापर्यंत 1 कोटी 60 लाख खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता दोन कोटीच्यावर खात्यांमध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका. आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत. तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू. पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू. शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात. तशी तरतूद करण्यात येईल. काहीही झालं पुढचे पाच वर्षे ही योजना बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहील, असा दावा त्यांनी केला.

आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार. मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात. तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले. दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता दलित समाजाचे पैसे दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांकरता हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देत आहोत. आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून अधिक आणि देत नाहीत आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत. कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रमात लवकरच हा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.