एक धक्कादायक घटना रायगडमधून समोर आली आहे. सुप्रसिद्ध जोशी वडेवाले हॉटेलमध्ये खाद्य पदार्थाची तक्रार केल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांने ग्राहकाला मारहाण केली. मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खाम्यासाठी दिलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार केल्यानंतर हॉटेलकडून दादागिरी करण्यात आली. हॉटेलमध्येच काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांने 2 लहान मुलांसह गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केली.
नेमक प्रकरण काय?
नाश्त्यातील वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार चालकाकडे करण्यात आली. यानंतर तक्रार पूर्ण ऐकून घेण्याआधीच तक्रारदार महिलेवर दमदाटी आणी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत हॉटेल कर्मचाऱ्यांकडून खुर्चीचा वापर करण्यात आला. तसेच मारहाण झालेली महिला गर्भवती होती. या घटनेत 2 चिमुकल्यांसोबतही अमानुष कृत्य केले आहे. तसेच महिलेच्या परीलाही मारहाण केली. त्यांना नखाने ओरबडण्यात आले आहे. हॉटेल व्यवसायिकासह कर्मचाऱ्यांकडून हे कृत्य करण्यात आले आहे.
माणगाव शहरातील रेल्वे स्टेशन इथं 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. काव्या हेलगावकर आणि अंकित हेलगावकर अशी मारहाण झालेल्या दांपत्याचे नाव आहे. तर शुभम जेसवाल असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना जोशी वडेवाले हॉटेल हे नेहमी पहायला मिळते. अनेक प्रवाशी वडापाव खाण्यासाठी इथं थांबत असतात. पण रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथं जोशी वडेवाल्यांच्या एक युनिटमध्य अशी धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ:
प्रसिद्ध जोशी वडेवालेच्या कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, वड्यात मीठ जास्त विचारले म्हणून गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण, रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील घटना pic.twitter.com/jqgxgY2h0u
— News18Lokmat (@News18lokmat) September 13, 2024