राज्यपाल नियुक्त 12 जागा मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. अशातच आता या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. आधी समसमान वाटप होणार होतं. 4- 4- 4 चा फॉर्मुला ठरला होता. मात्र आता भाजपाला 6 शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती मिळते आहे, असं शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत. चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देतील, अशी मला अपेक्षा आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत.