माणदेश एक्सप्रेस न्युज/ करमाळा : उजनी बोट दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला असून, तब्बल 40 तासानंतर उजनीतील शोधकार्य संपले आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत. तब्बल 40 तासांच्या शोध मोहीमेनंतर उजनीत धरणात सुरु असणारं शोधकार्य संपले. गेल्या दोन दिवसांपासून शोधकार्य सुरु होतं. अखेर आज सर्व मृतदेह NDRF च्या हाती आले आहेत.
दुर्घटना 21 मे रोजी सायंकाळी घडली होती
बोटीमधील सर्व प्रवाशी हे कुगावकडून कळाशीच्या दिशेने जात होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळे रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले, हि आणि घटना घडली. यामध्ये सहा प्रवाशी बुडाले होते. काल दिवसभर शोधकार्य करुनसुद्ध एकही मृतदेह हाती लागला नव्हता. मात्र, आज सकाळी पाच मृतदेह NDRF च्या जवानांना सापडले होते. त्यानंतर राहिलेला एक मृतदेह देखील शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे. अखेर 40 तासानंतर NDRF चे शोधकार्य संपले आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावे
1) गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30),
2) कोमल गोकूळ जाधव (वय 25),
3) शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष),
4) माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर)
५) अनुराग अवघडे (वय 35) रा. कुगाव
६) गौरव डोंगरे (वय 16) रा. कुगाव