‘औकातीत राहून बोलायचं आणि औकातीत विकास करून घ्यायचा’ ,तानाजी सावंतांचा शेतकऱ्यांना दम

0
292

वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी आता आणखी एक वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात हा प्रकार पाहायला मिळाला. “सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत”, असं म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला. डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधत होते. तेव्हा काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत काही प्रश्न विचारले. त्यावर सावंत यांनी संताप व्यक्त केला

तानाजी सावंत यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही”.