बदलापूरच्या घटनेवर जयंत पाटलांनी मोठ वक्त्यव्य केल आहे. पोलीस फक्त राज्य सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. असं नसतं तर आतापर्यंत शाळा प्रशासनावर कारवाई झाली असती. सरकार लाडकी बहीण योजनेत व्यस्त आहे. मात्र, याच बहिणींच्या मुली असुरक्षित आहे, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांश बोलत होते.
बदलापूरची घटना ही सामान्य माणसाला चीड आणणारी आहे. यावर कोणी राजकारण करायची गरज नाही. लहान बालकं सुरक्षित नाहीत, हे सरकार नाकरते आहे. महिला सुरक्षित नाहीत. एका योजनेमुळे सरकारला असं वाटतेय हीच योजना आपली तारणहार आहे. पण अर्थ खात्याला झोप लागत नसेल. पण आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.