मुलींना शॉपिंग करायला प्रचंड आवडतं… मुलींचा मूड चांगला असो किंवा वाईट मुलींना शॉपिंग केल्यानंतर आनंद मिळतो.. पण मुलींना अधिक आनंद स्ट्रीट शॉपिंग करताना येतो. प्रत्येक शहरामध्ये असे मार्केट असतात जे स्वस्त आणि तेथे चांगले कपडे मिळतात. मुंबईमध्ये देखील असे अनेक मार्केट आहेत, ज्याठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारचे कपडे आणि इतर लागणाऱ्या वस्तू देखील मिळतात… तर आज जाणून घेऊ मुंबईतील असे पाच मार्केट जेथे कमी दरात फक्त कपडेच नाही तर, इतर अनेक वस्तू देखील मिळतात…
कोलाबा कॉजवे :दक्षिण मुंबईमध्ये असलेलं कोलाबा कॉजवे मार्केट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. येथे बुटीकपासून ते फूटपाथपर्यंत दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. येथे तुम्ही सर्व प्रकारचे कपडे, ॲक्सेसरीज आणि चप्पलांचे शेकडो डिझाईन्स पाहू शकता. येथे खाण्यापिण्याची देखील उत्तम व्यवस्था आहे. स्ट्रीट शॉपिंग सोबतच तुम्ही येथे स्ट्रीट फूडचा आनंदही घेऊ शकता.
हिल रोड : वांद्रे येथील हिल रोड याठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारचे वेस्टर्न आउटफिट मिळतात. हा मार्केट सकाळी सुरु होतो ते, रात्री 10 वाजेपर्यंत मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी असते. वांद्रे स्टेशनला पोहोचल्यानंतर तुम्ही फार रिक्षाने मार्केटमध्ये पोहोचू शकता. मार्केटमध्ये वेग-वेगळ्या प्रकारचे कपडे तुमचं लक्ष वेधून घेतात.
क्रॉफोर्ड मार्केट: क्रॉफोर्ड मार्केट जवळपास 150 वर्ष जुनं मार्केट आहे. शाहरातील सर्वात जुनं मार्केट म्हणून देखील क्रॉफोर्ड मार्केटची ओळख आहे. या मार्केटमध्ये कपडे आणि फॅशनच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध नाही. तर या मार्केटमध्ये स्वयंपाकघर आणि जीवनशैलीशी संबंधित गोष्टी, होम डेकॉरसाठी लागणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येईल.
चोर बाजार : तुम्हाला तुमच्या घराला आकर्षक लूक द्यायचा असेल तर चोर बाजार तुमच्यासाठी योग्य आहे. इतर मार्केटच्या तुलनेत इथल्या वस्तू थोड्या महाग असतील, पण तुम्हाला इथे मिळणाऱ्या गोष्टी इतर कोणत्याही मार्केटमध्ये मिळणार नाहीत. येथे तुम्हाला होम डेकॉरसाठी लागणारे दिवे, फोटो फ्रेम्स, फर्निचर आणि अशा अनेक गोष्टी मिळतील. ज्यामुळे तुमचं घर अधिक आकर्षक वाटेल…
लोखंडवाला मार्केट : मुंबईमधील लोखंडवाला मार्केट देखील फार मोठं मार्केट आहे. याठिकाणी महिलांसोबतच पुरुषांसाठी देखील कपडे, फोन अक्सेसरीज मिळतात. येथे तुम्हाला अतिशय स्टायलिश कपडे मिळू शकतात याठिकाणी मुलांसाठीही खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला खरेदीसोबतच खाण्यापिण्याची आवड असेल तर येथे तुम्ही स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये, चाट, पाणीपुरी, लस्सी इत्यादींचा आनंद घेऊ शकता.