कानपूरमध्ये एका 19 वर्षीय मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा तो रुळांवर बसला होता आणि फोनवर कॉल करत होता. गुरुवारी 31 जुलै रोजी ही घटना घडली आहे. त्यानंतर त्याचा शोध सुरू होती. शनिवारी, 3 ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह सापडला. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, क्षितिज त्रिपाठी असे मृत मुलाचे नाव असून तो मूळचा दिबियापूर, औरैया येथील आहे. तो १२ वीचा विद्यार्थी होता. क्षितिज पंकी पडाव येथे त्याचे काका सतीश चंद्र यांच्याकडे राहत होता. क्षितिज हा त्याचा मित्र जतीनच्या घरी वारंवार जात असे. घटनेच्या दिवशी तो जतीनच्या घरी जात असल्याची माहिती त्याने काकांना दिली होती.
उशीर झाल्याने क्षितिजच्या कुटुंबीयांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद होता. चिंतेत त्यांनी त्याचा मित्र जतीन याच्याशी संपर्क साधला असता त्याने क्षितिज त्याच्याकडे आला नसल्याची माहिती दिली. त्यामुळे क्षितिजच्या कुटूंबीयांची चिंता वाढली. क्षितिजपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कुटुंबीयांनी क्षितिजचा शोध घेतला. त्यादरम्यान शेजाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना आदल्या रात्री झालेल्या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला. कुटुंबाने जीआरपी सेंट्रलशी संपर्क साधला, त्यांनी नंतर पोस्टमॉर्टम हाऊसला भेट दिली आणि क्षितिजच्या ओळखीची पुष्टी केली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी क्षितिजची ओळख पटवली. पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांनी खुलासा केला की, क्षितिजला रेल्वे ट्रॅकवर बसून गप्पा मारण्याची सवय होती.
या दुःखद घटनेच्या दिवशी, जेव्हा त्याला ट्रेनने धडक दिली तेव्हा तो असेच करत होता. अपघातानंतर त्याचा फोन चोरीला गेल्याचा संशय आहे. जीआरपी सेंट्रलने सांगितले की, पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.