जगात रुपयाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे. पण कधी कधी हे रुपये काही कारणांमुळं अधिक मौल्यवान ठरतात. आज आपण जगातील सर्वात महागड्या नाण्यांबद्दलची (Most Expensive Coins) माहिती पाहणार आहोत. मोठ्या किंमतींना या नाण्यांची विक्री झाली आहे. या सामान्य दिसणाऱ्या नाण्यांची किंमत इतकी आहे की ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
अमेरिकेचे फ्लोइंग हेयर सिल्वर कॉपर डॉलर
अमेरिकेचे फ्लोइंग हेयर सिल्वर कॉपर डॉलर (Flowing Hair dollar) हे जगातील सर्वात महागड्या नाण्यांपैकी एक आहे. या नाण्याचा 2013 मध्ये लिलाव करण्यात आला होता. यावेळी हे सर्वात महागडे नाणे होते. अमेरिकेने 1792 मध्ये अशा नाण्यांचे उत्पादन सुरू केले होते. ही नाणी फक्त दोन वर्षांसाठी बनवली गेली होती. या नाण्याची जवळपास 75 कोटी रुपयांना विक्री झाली आहे.
डबल ईगल
डबल ईगल (Double Eagle) हे नाणे अमेरिकेत 1933 मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्यांवर नंतर राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी बंदी घातली होती. आज हे नाणे बाळगणे बेकायदेशीर आहे. ते त्वरित जप्त करण्याचा अधिकार आहे. या नाण्याची किंमत जवळपास 57 कोटी रुपये आहे.
सेंट-गॉडन्स डबल ईगल नाणे
सेंट-गॉडन्स डबल ईगल नाणे ( Double Eagle Coin) 1907 मध्ये जारी केले होते. जगातील सर्वात मौल्यवान नाण्यांमध्ये त्याची गणना होते. या नाण्याची किंमतही जवळपास 57 कोटी रुपये आहे.
ब्रशर डबलून नाणे
ब्रशर डबलून नाणे (Brasher Doubloon coin) हे देखील मौल्यवान नाणे आहे. हे नाणे 1787 मध्ये जारी करण्यात आले होते. त्याची किंमत सुमारे 55 कोटी रुपये आहे.
एडवर्ड III फ्लोरिन
जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात महागडे नाणे एडवर्ड III फ्लोरिन असे आहे. हे नाणे 1343 साली चलनात आले होते. या नाण्याची किंमत 50.49 कोटी रुपये आहे.