नाशिकमध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीच्या हत्येची खबळजनक घटना, थरार सीसीटीव्हीत कैद!

0
662

नाशिकरोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर्स या दुकानासमोर एका 38 वर्षीय इसमावर अज्ञात तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने खून केला. प्रमोद वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून एकूण तिघांनी त्याच्यावर हल्ला केला होता. 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली.

हत्येचा सीसीटीव्ही आला समोर
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात प्रमोद वाघ यांच्यावर अज्ञात तिघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा सीसीटीव्ही सध्या समोर आला असून हल्लेखोर अत्यंत निर्घृणपणे प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करताना दिसतोय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून ही हत्या झाली आहे.

प्रमोद वाघ रक्ताच्या थारोळ्यात
प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला होता. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद वाघ यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून शोध चालू
हा हल्ला नेमका कशामुळे घडला याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे कर्मचारी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

नाशिकमध्ये पोलिसांवरच हल्ला
एकीकडे ही हत्येची घटना घडलेली असताना दुसरीकडे नाशिकमध्येच एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. नाशिकमधील सिडके परिसरातील केबल पार्क या परिसरात दोन गटांत वाद सुरू झाला होता. बांधकामाच्या मुद्द्यावरून हा वाद चालू झाला होता. मात्र दोन गटातील एका गटाने थेट पोलिसांवरच हल्ला केला. आठ ते दहा जणांनी केलेल्या या हल्यात पोलीस निरीक्षक सुनील पवार जखमी झाले. त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. तर उपनिरीक्षक सविता उंडे यांच्याशी शिवीगाळ करत त्यांच्यावर धक्काबुक्की करण्यात आली.