एक आई आपल्या मुलावर निस्वार्थी प्रेम करते. असं म्हणतात की, ती आपल्या मुलाला संकटात पाहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबद्दल वाचून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. यात जन्मदात्या आईने आपल्या लहान मुलाला बेदम मारहाण करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. आई आपल्या मुलाला मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका क्रूर आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो आपल्या मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती महिला चिमुरड्याच्या छातीवर बसून मुलाला अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. ही महिला त्या मुलाच्या छातीवर बसून त्याचं डोकं जमिनीवर आपटतेय, मध्येच त्याचा गळा दाबतानाही दिसतेय. मूल स्वतःला वाचवण्याची विनवणी करत आहे, रडत आहे, आईकडे जीवाची भीक मागत आहे. मुलगा वारंवार पाणी मागताना दिसत आहे, पण आईचं हृदय तरीही पिघळत नाही. पण, आईला त्या मुलाची अजिबात कीव येत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
व्हिडीओवर महिलेची प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पतीसोबत गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू असून पती घरी राहत नाही आणि पैसेही पाठवत नाही. बराच काळ तो घरी आलेला नाही. दुकानात काम करून ही महिला केवळ घरखर्च भागवते. पतीला घाबरवण्यासाठी आणि घरातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तिने आपल्या मोठ्या मुलासोबत हा व्हिडीओ बनवला होता आणि दोन महिन्यांपूर्वी पतीला पाठवला होता, त्यानंतर तिच्या पतीने तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. महिलेने सांगितले की, मारहाणीदरम्यान तिने मुलाच्या छातीवर डोके ठेवण्याचे नाटक केले होते, परंतु मुलाला चावा किंवा दुखापत केली नाही.
व्हिडीओवर पोलिसांची प्रतिक्रिया
या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांची प्रतिक्रियाही व्हिडीओवर आली आहे. व्हायरल व्हिडीओवर पोलिसांनी सांगितले की, महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. तिचा पती घरी येत नाही किंवा तिला राहण्याचा खर्चही देत नाही, अशा परिस्थितीत पतीला घाबरवण्यासाठी महिलेने आपल्याच मुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवून पतीला पाठवला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, हा व्हिडीओ दोन महिन्यांचा आहे. महिला आणि बालकांचे ‘पहिल्या टप्प्यातील समुपदेशन’ केले जात आहे. कोणत्याही दिवशी महिलेच्या घरी जाऊन मुलाची शारीरिक तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे झाब्रेडा पोलिसांचेही या प्रकरणावर लक्ष आहे. महिलेच्या पतीची बाजूही तपासली जात आहे.
पाहा व्हिडीओ:
क्या दुनिया में माँ ऐसी भी होती हैं?
रूह कंपा देने वाली वीडियो 😡😡90 KG की महिला अपने छोटे 25 KG बेटे के ऊपर बैठकर उसे मुक्कों, दांतों सर पटकना गाला दबाना !!
एक मासूम छोटा बच्चा वहीं पर खड़ा देख रहा!
अगर ये सच है तो इसको जल्द गिरफ्तार करे !! #viralvideo #up #uttrakhand pic.twitter.com/NCZzsihfCw— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) July 17, 2024
पण, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी या निर्दयी आईवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.