अनेक महिन्यांपासू सुरू असलेल्या चर्चा, अफवा अखेर खऱ्या ठरवत भारताचा क्रिकेटपटून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकने अखेर विभक्त होण्याचा निर्णय सर्वांसमोर जाहीर केला. गुरूवारी रात्री हार्दिक -नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कायदेशीररित्या वेगळं होतं असल्याची ( घटस्फोटाची) घोषणा केली. त्यांचा हा निर्णय अनपेक्षित नसला तरी काहींसाठी धक्कादायक होता. कारण हार्दिक-नताशाचे चाहते त्यांच्या एकत्र राहण्यासाठी प्रार्थना करत होतो. मात्र आता या दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक-नताश यांना अगस्त्य नावाचा एक तीन वर्षांचा मुलगाही आहे.
काही महिन्यांपूर्वीच नताशाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून तिच्या नावातील पांड्या हे पतीचे आडनाव हटवल्यानंतर या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर बराच काळ वेगवेगळ्या बातम्या, अफवा समोर येत होत्या. मात्र त्यावर हार्दिक-नताशाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर काल (गुरावर) त्या दोघांनी आपण विभक्त होत असल्याचा निर्णय सर्वांसमोर जाहीर केला. ‘ हा आमच्यासाठी नक्कीच खूप कठीण निर्णय होता. अगस्त्य आमच्या दोघांच्या आयुष्यात एक भाग राहिल. आम्ही दोघेही त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न करू, ‘ असे नताशा-हार्दिकने त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
चार वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेणाऱ्या या जोडप्याची पहिली भेट कुठे झाली, त्यांचा प्रवास कसा होता ? जाणून घेऊया टाईमलाईनमधून –
2018 मध्ये नाईट क्लबमध्ये झाली पहिली भेट
नताशा आणि हार्दिक यांची पहिली भेट 2018 मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती. तेव्हा हार्दिक पहिल्याच नजरेत नताशाच्या प्रेमात पडला होता. यानंतर नताशा हार्दिकच्या वाढदिवसासाठी हजर होती आणि तेथूनच त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या.
जानेवारी 2020 मध्ये साखरपुड्याची केली घोषणा
सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल असलेली नताशा स्टॅनकोविक हीने भारतीय क्रिकेट हार्दिक पांड्याशी साखरपुड्याची घोषणा केली आणि ती चर्चेत आली. हार्दिकने नताशाला यॉटवर प्रपोज केले होते. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांचे फोटोदेखील पोस्ट केले होते ज्यामध्ये नताशा हार्दिकसोबत तिची एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसली होती.
कोविड-19 दरम्यान झालं लग्न
जगभरात कोविडची साथ पसरलेली असताना, लॉकडाऊनदरम्यानच हार्दिक आणिइ नताशाने 31 मे 2020 साली कोर्ट मॅरेज केलं आणि खासगी समारंभात ते विवाहबद्ध झाले.
जुलै 2020 मध्ये झाला मुलाचा जन्म
त्यानंतर लगेचच जुलै 2020 मध्ये हार्दिक-नताशाच्या घरी छोट्या पाहुण्याचे, त्यांच्या मुलाचे आगमन झाले. लग्नापूर्वीच नताशा प्रेग्नंट होती.
14 फेब्रुवारी 2023 मध्ये केला शाही विवाह
त्यानंतर तीन वर्षांनी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर 14 फेब्रुवारी 2023 रोजी हार्दिक-नताशाने एका शाही विवाह सोहळ्यात पुन्हा लग्न केलं. त्यांच्या या लग्नात कुटुंबीय, मित्र-मैत्रीणी आणि अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
मे 2024 पासून सुरू झाल्या घटस्फोटाच्या चर्चा
लग्नानंतर नताशा आणि हार्दिकच्या आयुष्यात सर्व काही ठीक सुरू होतं. मात्र मे 2024 मध्ये, नताशाने अचानक तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हार्दिकचे आडनाव काढून टाकले तेव्हा या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा सुरू झाल्या. त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चाही सुरू होत्या.
T20 विश्वचषक 2024 विजयानंतर अफवा झाल्या तीव्र
भारतीय संघाने जून महिन्यात T20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. त्यांच्या विजयाचे जंगी सेलीब्रेशन झाले. पण त्यावेळीही नताशाने भारतीय संघाला किंवा हार्दिकला शुभेच्छा देणारी कोणतीच पोस्ट लिहीली नाही. सोशल मीडियावरूल तिच्या मौनमुळे अनेक लोकांचे लक्ष तिकडे वेधले गेले. आणि हार्दिक-नताशाचं बिनसल्याच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला.
जुलैमध्ये केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा
अनेक महिन्यांच्या चर्चा, अफवा, बातम्यानंतर अखेर काल ( १८ जुलै) हार्दिक-नताशाने अधिकृतरित्या घोषणा करत आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. दोघांनी एका संयुक्त स्टेटमेंटद्वारे लग्नाच्या चार वर्षांनी वेगळं होत असल्याची घोषणा केली.