मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा सीजन खूपच निराशाजनक ठरला. अगदी शेवटच्या सामन्यातही लखनऊ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला आहे. कॅप्टन बदलूनही मुंबई इंडियन्सला काही फायदा झाला नाही. फक्त त्यांना 4 विजय मिळाले. 10 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. सीजनमधील शेवटच्या सामन्यात टीम पराभूत झाल्यानंतर फ्रेंचायजीच्या मालक नीता अंबानी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना आत्मविश्वास दिला. “हा आपल्यासाठी निराशाजनक सीजन होता. पण मी अजूनही मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे टीमची जर्सी परिधान करणं हा माझा सन्मान समजते” असं नीता अंबानी म्हणाल्या.
त्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना रोहित शर्मा, कॅप्टन हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा विशेष उल्लेख केला. “आपल्या सर्वांसाठी हा निराशाजनक सीजन होता. आपल्याला हवं तसं घडलं नाही. पण मी अजून मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे. फक्त मालक म्हणून नाही, मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करण हा माझा सन्मान आहे. जे झालं, त्याचा आढावा घेऊ, विचार करु” असं नीता अंबानी म्हणाल्या. पुढच्या महिन्यात टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या मुंबई टीममधील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
“रोहित, हार्दिक, सूर्या आणि जसप्रीत सर्व भारतीय तुमच्या पाठिशी आहेत. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा” असं नीता अंबानी म्हणाल्या. शुक्रवारी मुंबई इंडियन्स टीमचा या सीजनमधील 10 वा पराभव झाला. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधील हा शेवटचा सीजन असू शकतो, अशी चर्चा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. क्रिकेटपेक्षापण कॅप्टनशिप बदल, रोहित शर्मा-हार्दिक पांड्यामधील मतभेद, टीममधील अंतर्गत गटबाजी यामुळे मुंबई इंडियन्सची टीम यंदा जास्त चर्चेत राहिली.
पहा व्हिडीओ :
x.com/…ipaltan/status/1792056139896754574