मेष: आज तुमची मनोकामना पूर्ण होईल. एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल. त्याचं सानिध्य मिळेल. त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. व्यापारात उन्नती होईल. नोकरीत मन लावून आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या तुमच्या गुणाची तारीफ होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर प्रभावीत होतील. एखाद्या जुन्या प्रकरणाचा तुमच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. व्यापारी असाल तर जीभेवर नियंत्रण ठेवा. मोठं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खास आहे.
वृषभ: आज राग आणि जीभेवर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात कुणाशी तरी अकारण वाद होऊ शकतो. उद्योगात वारंवार निर्णय बदलू नका. त्यामुळे स्थैर्य जाते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी भटकंती करावी लागणार आहे. धर्मकार्यात भाग घ्याल. मित्रांकडून धोका होण्याची शक्यता आहे. उधारी देऊ नका. मद्यप्राशन करून वाहन चालवू नका. नाही तर तुरुंगात जावं लागेल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. संध्याकाळनंतरचा दिवस उत्तम जाईल.
मिथुन: आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाच्या बातमीने होईल. नोकरीत उच्चपदस्थांसोबत उठबस होईल. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढून लाभही मिळले. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात रुची वाढेल. दूरच्या देशात राहणाऱ्या प्रियव्यक्तीचा शुभ समाचार कळेल. राजकारणात असाल तर तुमचं वर्चस्व वाढेल. एखाद्या सामाजिक कार्याची जबाबदारी घ्याल. रोजगाराचा शोध संपुष्टात येईल. कोर्टकचेरीतील विघ्न मित्राच्या मदतीने दूर होईल. कृषी योजनेचा लाभ मिळेल. दूरचा प्रवास घडेल.
कर्क: शेअर, लॉटरीतून आज अचानक लाभ होईल. एखादं महत्त्वाचं कार्य पार पाडण्यासाठीचा चांगला योग आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. विवाह इच्छुकांनाची मनोकामना आज पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती होईल. धंद्यात नवे पार्टनर बनवाल. अनिच्छेने दूरचा प्रवास करावा लागणार आहे. जमा केलेली रक्कम वायफळ खर्च होणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यातील लोकांची बदली होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती कमजोर झाल्याने चिंता वाढेल.
सिंह: आज कार्यक्षेत्रात धावपळ करावी लागेल. प्रिय व्यक्तीशी अकारण मतभेद होतील. खराब आर्थिक स्थितीमुळे अपमान होईल. बहुराष्ट्र कंपनीत काम करणाऱ्यांना दूरच्या देशात जाण्याचा योग आहे. कौटुंबिक कार्यात भाग घ्याल. स्वादिष्ट अन्नावर ताव माराल. अडकलेली रक्कम मिळणार आहे. एखाद्या खास व्यक्तीचा सहवास लाभणार आहे. राजकारणात वर्चस्व स्थापन होईल. रोजगाराच्या संधी मिळतील. एखादं अर्धवट काम पूर्ण होण्याचा योग आहे.
कन्या: आज व्यापारात नवीन सहकारी जोडाल. क्रीडा क्षेत्रात मोठ्या संघर्षानंतर लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती होणार आहे. तुम्ही सांगाल तिथे तुमची नियुक्ती होईल. रिलेशनशीपमध्ये असणारे पार्टनरसोबत डेटिंगला जातील. नव्या ओळखी वाढणार आहेत. एखादं अर्धवट काम आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. कुटुंबातील कुरबुरी थांबतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. सासोयटीच्या मिटिंगमध्ये तुमचा दबदबा वाढेल.
तूळ: उद्योग क्षेत्रातील लोकांना शुभ समाचार मिळेल. नोकरीत उच्च पदावर जाल. तुमचं कार्य प्रामाणिकपणे पार पाडाल. व्यापारात मित्राचं सहकार्य मिळेल. आयात निर्यातीशी संबंधित क्षेत्रातील लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासा रुची वाढेल. नोकरदार महिलांना आज नोकरीत मोठी संधी मिळेल. गृहिणींसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तब्येत सांभाळा, पावसाळी आजार डोकं वर काढेल.
वृश्चिक: आजचा दिवस संमिश्र असा आहे. दिवसाची सुरुवात सुख आणि प्रगतीची असेल. दूरचा प्रवास होणार आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. वाहने सावकाश चालवा. नोकरीत जीभेवर ताबा ठेवा. नोकरीत बॉसची नाराजी ओढवून घ्याल. प्रेयसीशी भांडण होईल. पती-पत्नीतील वाद दूर होतील. मित्र परिवारात वाद विवाद टाळा. कौटुंबिक मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. कोर्टाच्या प्रकरणातून सुटका होईल. फिरायला जाण्याचा बेत आखाल.
धनु: आजचा दिवस चढउताराचा आहे. धैर्याने काम करा. विरोधकांपासून सावध राहा. जोपर्यंत एखादं काम पूरअण होत नाही, तोपर्यंत त्या कामाची चर्चा करू नका. व्यापारी वर्गाला अधिक परिश्रम करावा लागणार आहे. नोकरीतील समस्या वाढतील. व्यवसायात मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर येतील. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. बहिणीची भक्कम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.
मकर: आजचा दिवस यथातथा जाईल. दिवसाची सुरुवात फार चांगली होणार नाही. दूरचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. पण धंद्यात खोट येणार आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. नोकरीत जीभेवर संयम ठेवा. नाही तर वाद होतील. तुमच्या बॉसची मर्जी मात्र तुमच्यावर बसेल. कोर्टाची प्रकरणे उद्भवणार आहेत.
कुंभ: सगेसोयरे भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा दिवस पाहुण्यांची उठबस करण्यात जाणार आहे. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीशी भेट होईल. व्यवसायातील गुपितं कुणाला सांगू नका. नव्या नोकरांवर विश्वास ठेवू नका. गावाला जाण्याचा योग आहे. शेतीची कामे हाती घ्याल. मनाला समाधान वाटणारा दिवस आहे. बायकोचा सल्ला उपयोगी पडेल. आरोग्य क्षेत्रातील लोकांच्या हातून सत्कार्य घडणार आहे. कुणावरही पूर्ण विश्वास टाकू नका.
मीन: आज धावपळीचा दिवस आहे. नोकरी करणाऱ्यांची जास्त धावपळ होईल. तर नोकरी शोधणाऱ्यांचीही धावपळ होणार आहे. आईवडिलांशी अकारण वाद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आज दिवस आहे. कोणतंही कार्य करताना तीन वेळा विचार करा. इतरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊ नका. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस बेस्ट आहे. महिलांनाही आजचा दिवस चांगला जाईल. इतरांच्या कोर्टाच्या प्रकरणात लक्ष घालू नका. नाही तर तुम्हालाच त्रास होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)