Gold-Silver Price : घसरणीनंतर सोन्याचे दर वधारले : १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? पहा सविस्तर

0
4723

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज शनिवारी सोन्याच्या दरात बदल झाले आहेत. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,५७० असून मागील ट्रेडमध्ये सोन्याची किंमत ७३,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९३,२६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,८८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती देशभरात बदलत राहतात.

मेट्रो शहरातील सोन्याची किमती
मुंबई :- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,३११ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,४३० प्रति १० ग्रॅम आहे. पुणे :- प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,३११ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,४३० रुपये आहे. नागपूर :- प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,३११ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,४३० रुपये इतका आहे. नाशिक :- प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,३११ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,४३० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक असून, स्थानिक पातळीवर तुम्ही तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

हे ही वाचा :- राज्यात आता ‘लाडका भाऊ योजना’; सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार 10 हजारांपर्यंत स्टायपेंड

हे ही वाचा :- बीपी जर अचानक वाढला तर घाबरून जाऊ नका, हे घरगुती उपाय करून पाहा

हे ही वाचा :- सांगली जिल्हा बँक गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई होणार : “या” मंत्र्यांनी दिले, आमदार गोपीचंद पडळकरांना उत्तर

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here