
हल्ली तरुण मुले नाश्ता करण्यासाठी गाड्यावर जातात आणि गरमागरम नाश्ता करतात. तुम्हाला माहिती आहे का की गाड्याजवळ गेल्यानंतर ग्राहक विक्रेत्याला पहिला पहिला प्रश्न कोणता विचारतो? ग्राहक नाश्ता करण्यासाठी गाड्यावर गेला की पहिला प्रश्न विचारतो “गरम काय आहे?” त्यानंतर विक्रेता त्याला गरम कोणता पदार्थ आहे, हे सांगतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण जेव्हा विक्रेत्याला गरम काय आहे? असे विचारतो, तेव्हा विक्रेत्याचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
काय म्हणाला विक्रेता?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गाडा दिसेल. या गाड्यावर तुम्हाला दोन तीन डझनभर पाव दिसतील आणि वडापावच्या प्लेट दिसतील. एक तरुण येतो आणि विक्रेत्याला विचारतो, “भाऊ गरम काय आहे?” तर यावर विक्रेता जे उत्तर देतो, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. विक्रेता एकच शब्द बोलतो, “तवा” विक्रेत्याचे उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील आहे. पुण्याच्या गोखलेनगर परिसरातील हा व्हिडीओ आहे. असं म्हणतात, “पुणेकरांच नाद करायचा नाही.” हे अगदी खरंय. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
पहा व्हिडीओ:
instagram.com/reel/C50w573tJW0