१२ वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यास पात्र कोण?

0
78

 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. आता 12 पास असणाऱ्या उमेदवांराना देखील सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. हरियाणामध्ये अटल सेवा केंद्रात ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचा 12वी उत्तीर्ण उमेदवारअर्ज करू शकतो. जर तुम्हीही पात्र असाल आणि या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2024
नोकरी अटल सेवा केंद्रात ऑपरेटरची असणार आहे. निवड झाल्यानंतर राज्यातील सर्व पंचायतींमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1500 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज फक्त ऑनलाइन असणार आहेत. अटल सेवा केंद्र हरियाणातील ऑपरेटर पदांसाठी अर्ज 25 जूनपासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2024 आहे. बाकी फक्त तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर अर्ज करु शकता.

अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यास पात्र कोण?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ASKO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. हे करण्यासाठी अधिकृत वेबसाइट पत्ता आहे – oprecruitment.hpaa.in. या वेबसाइटवर लॉग इन करून तुम्ही अर्ज करू शकता. आम्ही आधीच सांगितले आहे की या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 42 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.

उमेदवारांची लेखी परीक्षा होणार
अटल सेवा केंद्राच्या ऑपरेटर पदांवरील निवडीसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल. दरम्यान, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. निवडल्यास, वेतन 12600 रुपये ते 25,800 रुपये प्रति महिना आहे. या संदर्भात इतर कोणतीही माहिती मिळविण्यासाठी, आपण वर नमूद केलेल्या वेबसाइटला भेट देऊ शकता. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. कारण, अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2024 आहे.