माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांची शिवाजी विद्यापीठाच्या व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
त्यांनी अर्थशास्त्र विषयाची 60 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. संशोधन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते पी एचडी चे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. तर 45 पेक्षा अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले असून त्यांच्या संशोधन पेपरला धनंजय गाडगीळ बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी मराठी अर्थशास्त्र परिषद व शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य म्हणून कार्य केले आहे. शिवाजी विद्यापीठ गुणवंत शिक्षक पुरस्कार,रयत शिक्षण संस्थेचा पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.
24 वर्ष एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही कार्य केले आहे. सध्या ते श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी च्या प्राचार्य पदाची धुरा पार पाडत असून, शिवाजी विद्यापीठाच्या व्यावसाईक अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल समाजातील सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.