मेट्रोसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडाली कार,पहा व्हिडीओ

0
14

रात्रभरापासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 1 चा छत कोसळली. तर आज दुपारी शहरातील मलका गंज येथील परिसरातील हंसदाज कॉलेजवळ एक कार खड्ड्यात बुडाली आहे. मुसळधार पावसाने या घटना होत आहे. हा खड्डा मेट्रोसाठी खोदण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले. कार खड्ड्यात बुडाली असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. क्रेनच्या सहाय्याने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

पहा व्हिडीओ: