पुण्यात झीका वायरसचा धोका वाढला; कोथरूडमध्ये दोघांना लागण

0
6

जगात कोरोना संपला नाही तोच झीका वायरसने डोके वर काढले आहे. पुण्यात  झिका वायरसचे  दोन रुग्ण आढळून आले आहेत. 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झीकाची लक्षणे आढळून आली आहेत. महाराष्ट्रात ऐन वारीच्या तोंडावर झिका रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. झिका वायरस हा डासांच्या उत्पत्तीमुळे पसरतो. त्याचा धोका जास्तकरून महिलांना असतो. त्यातही गरोदर महिलांना. त्यामुळे गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितले आहे .झिका विषाणू जीवघेणा नसला तरी महिलांवर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सध्याचे हवामान पाहता. हे हवामान आजारांच्या वाढीला हातभार लावणारे आहे.

झीकाची लक्षणे ?

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.

काळजी कशी घ्याल?

घरामध्ये साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये. त्याने डास होतात. पाणी उघडे ठेवू नये.
या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे.

झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गरम पाणी प्या.

ताप आणि अंगावर लाल चट्टे येत असल्याची लक्षणे दिसून आल्यामुळे डॉक्टरांनी स्वत:च्या रक्ताचे नमुणे 18 जून रोजी तपासणीसाठी पाठवले होते. रिपोर्ट 20 जून रोजी आल्यानंतर त्यांना झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समजले. डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.