बंगले, गाड्या, कोट्यावधींची संपत्ती,दर महिन्याला सरकारी पगार तरीही कर्जबाजारी आहे ‘हा’ अभिनेता

0
6

 

या अभिनेत्याने भोजपुरी सिनेमांपासून ते साऊथच्याही अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं आहे. तो फक्त अभिनेताच नाही तर एक राजकीय नेता देखील आहे. लक्झरी आयुष्य जगूनही या अभिनेत्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे.

या अभिनेत्याचं नाव रवी किशन आहे.रवी किशन यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्द ही पीतांबर सिनेमांमधून केली. त्यानंतर ते हेरा फेरी’, ‘कुदरत’, ‘आर्मी’, ‘तेरे नाम’ यांसारख्या हिट सिनेमांचा भाग झाले. पण त्यांना भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये जास्त लोकप्रियता मिळाली.
त्यांच्या काही प्रसिद्ध भोजपुरी चित्रपटांमध्ये सैयान हमारा, कब होई गवाना हमारा, दुल्हा मिलाल दिलदार, गब्बर सिंग, गंगा आणि बांके बिहारी एमएलए यांचा समावेश आहे. या चित्रपटांनी रवी किशन यांना भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बनवले.

2014 मध्ये रवी किशन यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी यूपीच्या जौनपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. नंतर रवी किशन यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये गोरखपूरमधून निवडणूक लढवली. यावेळी ते तीन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. 2024 च्या निवडणुकीतही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

बातम्यांनुसार, अभिनेता खासदार म्हणून 1 लाख रुपये मानधन घेतो आणि तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 50 लाख रुपये फी घेतो.
इतकंच नाही तर राजकारणी बनलेल्या अभिनेत्याकडे 11 घरं आहेत, ज्यात मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात एक फ्लॅट, पुण्यातील स्काय विमान नगरमध्ये एक फ्लॅट, मुंबईच्या जोगेश्वरी इथं एक बंगला, ओशिवरा इथं एक फ्लॅट, गोरेगाव पश्चिम इथला फ्लॅट, गोरखपूर, जौनपूरमधील फ्लॅट आणि इतर बंगल्यांचा समावेश आहे.

55 वर्षीय रवी किशन यांची एकूण संपत्ती 36 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 14.96 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 20.70 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. त्यांच्याकडे 2.55 कोटी रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ताही आहे.मात्र, कोट्यवधींची संपत्ती असूनही, अभिनेता कर्जबाजारी असल्याची माहिती आहे. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, रवी किशन यांच्यावर 1.68 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

रवी किशनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच ‘लापता लेडीज’मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाने मने जिंकली. ‘मामला लीगल है’मध्येही त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. रवी किशन आता ‘JNU: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ मध्ये दिसणार आहे, ज्यात उर्वशी रौतेला, रश्मिका मंदान्ना आणि इतरही प्रमुख भूमिकेत आहेत.