सांगली पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण ; चाचणीचे गुण संकेतस्थळावर

0
19

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : तीन दिवसांपासून सुरू असलेली पोलिस भरतीची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. पोलिस चालक व शिपाई पदाच्या ४० जागांसाठी उमेदवारांनी चाचणी दिली. चाचणीचे गुण संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. ४०० उमेदवारांची निवड होऊन ते लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

४० जागांसाठी १७५६ जणांनी अर्ज केले होते. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर भरती प्रक्रियेत प्रमाणपत्र तपासणी, शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली. पोलीस शिपाई पदासाठी ७६० पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी ४४९ उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली. महिला शिपाई पदासाठी १४२ उमेदवारांना बोलविण्यात आले. त्यापैकी ६९ उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.

चालक पदासाठी ८१३ पुरूष उमेदवारांपैकी ४९८ जणांनी तर ४१ महिला उमेदवारापैकी २० जणांनी मैदानी चाचणी पूर्ण केली. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या शारीरिक व मैदानी चाचणीचे गुण संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. तीन दिवसात भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात पोलिस प्रशासनाला यश आले.

 

हरकतीसाठी २६ पर्यंत मुदत
पोलिस भरतीसाठी पात्र उमेदवारांचे शारीरिक व मैदानी चाचणी गुण सांगली पोलिसांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. या गुणपत्रिकेबाबत हरकतीसाठी २६ जून दुपारी १२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

 

सांगली पोलिस भरती  चाचणीचे गुण पाहण्यासाठी क्लिक करा