‘राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकारी’,म्हणत राऊतांनी घेतलं ‘यांच’ नाव

0
6

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेने नेते रवींद्र वायकर विजयी झाले. रवींद्र वायकर यांनी फक्त 48 मतांनी अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळं वायकरांच्या विजयावर प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. तसंच, वायकरांचा विजय हा मॅनेज केलेला होता, असा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. या प्रकरणी दोन अपक्ष उमेदवारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

‘कसं असतं जो चोर असतो तो पहिलं सीसीटीव्हीचं फुटेज चोरी करतं. तिथं जे अधिकारी होते ते राज्यातील सर्वात मोठे भ्रष्ट अधिकारी असून, तुम्ही त्यांच्या कामाचा इतिहास पाहिल्यास ते काय आहेत, त्यांचा इतिहास काय आहे सगळं समोर येईल. सर्वात भ्रष्ट अधिकारी कोण असेल तर त्या वंदना सूर्यवंशी असून त्यांनी अमोक किर्तीकरांविषयीचा निकाल हा मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली दिला आहे. आता आम्ही न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडेही जाणार आहोत,’ असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

 

चार महिन्यात परिवर्तन होणार आहे. तेव्हा या वंदना सूर्यवंशी कुठे जातील. हे जे अधिकारी आहेत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बंद केले. आत वायकरांचे नातेवाईक मोबाइल घेऊन फिरत होते. ही कोणाची जबाबदारी होती. सीसीटीव्ही मिळत नाहीये याची जबाबदारी सूर्यवंशीची आहे. हा मोठा घोटाळा असून तो वंदना सूर्यवंशींनी केला आहे. त्याचा संपूर्ण इतिहास माझ्याकडे आला आहे. लवकरच मी तो उघड करणार आहे, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांची गुलामी करणारे वंदना सूर्यवंशीसारखे अधिकारी त्यांना हा निकाल पचणार नाही. ही चोरी त्यांना पचणार नाही त्यांना जुलाब होणार. वंदना सूर्यवंशी यांचा प्रशासकीय इतिहास वादग्रस्त आहेत. अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तर वंदना सूर्यवंशी जबाबदारी आहे. रवींद्र वायकर यांचा मित्रपरिवार मोबाईल घेऊन फिरत होता त्यांना रोखला का नाही. आपण प्रमुख होतात निर्णय आपण जाहिर. या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.