माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक ०९ रोजी गोमेवाडी-लक्ष्मीनगर मार्गे करगणी जाणाऱ्या रस्त्यावरील पूल गेला वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आटपाडी तालुक्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग तीन दिवस झाले आटपाडी तालुक्याच्या विविध भागामध्ये पावसाचा जोर आहे. आज दिनांक ०९ रोजी करगणी जिल्हा परिषद गटामध्ये दमदार पाऊस झाला. सकाळ पासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने गोमेवाडी-लक्ष्मीनगर मार्गे करगणी जाणाऱ्या खटकाळी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आले होते. मोठ्या प्रमाणत पाणी आल्याने या ओढ्यावरील पुलाचा काही भाग एका बाजूने वाहुन गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे मान्सून दाखल झाला असून मान्सूनने दुष्काळी पट्यात हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून माळरानात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस जोरदारपणे पडला आहे. आटपाडी तालुक्यातील दुष्काळी भागात पाऊसच नसल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. आता मान्सून दाखल होताच पहिल्यांदाच जोरदार हजेरी लावल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
गोमेवाडी येथील वाहून गेलेल्या पुलाचा व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा.