
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/ प्रतिनिधी: आटपाडी-शेटफळे मार्गावर लेंगरेवाडी फाट्याजवळ घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात निलेश रामा माने यायुवकाचामृत्यू झाला होता तर सुप्रिव प्रशांत करडे हा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणीअपघातास जबाबदार असणाऱ्या प्राथमिक शिक्षक सागर सुपेकर याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुप्रिव प्रशांत करडे (वय २३, रा. लिंगिवरे, ता. आटपाडी) हे आपल्या मित्रासह दुचाकीवरून आटपाडीहून विजापूरकडे जात होते. त्यांच्यासोबत निलेश रामा माने (वय ३०, रा. लिंगिवरे, ता. आटपाडी) हे ही होते. ते होंडा शाईन (क्रमांक एमएच ४३ बीएस ४४०२) या दुचाकीवर प्रवास करत होते.
दरम्यान, लेंगरेवाडी फाट्याच्या अलीकडे थोड्याच अंतरावर समोरून येणाऱ्या सागर सुरेशराव सुपेकर (रा. आटपाडी) याने आपल्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न (क्रमांक एमएच २३ एजी ६९८१) ही दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून आयशर टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चुकीच्या दिशेने येत फिर्यादींच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादी सुप्रिव करडे व त्यांचा मित्र निलेश माने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान निलेश रामा माने यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी आरोपीसागरसुपेकरयाच्यावर गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातात सागर सुपेकर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.


