प्रणव गुरव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ; शिवसेना खानापूर आटपाडी विधानसभा प्रमुख पदी निवड

0
1

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व खानापुर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर,सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रणव गुरव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

याच वेळी त्यांची खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदी निवड करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभुते, दिघंचीचे मा. सरपंच अमोल मोरे, बाळासाहेब होनराव, दिलीप अण्णा कीर्दत, सरपंच महादेव जुगदर,धीरज मोरे,आदित्य गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here