
सध्या काजोलच्या ‘माँ’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अलिकडेच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. ‘माँ’नंतर काजोल आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देशभक्तीवर आधारित असलेल्या या सिनेमाचं नाव Sarzameen(सरजमीन) असं असणार आहे. सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘सरजमीन’ सिनेमात काजोलसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वी सुकुमारन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. ‘सरजमीन’ सिनेमाच्या टीझरमध्ये पृथ्वी काही अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. “सरजमीन की सलामती से बढ़कर कुछ नही” असं म्हणत तो दुश्मनाला प्रत्युतर देत आहे. तर दुसरीकडे या सिनेमात सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचीही वर्णी लागली आहे. ‘सरजमीन’मध्ये इब्राहिम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये त्याचा खुंखार अवतार पाहायला मिळत आहे.
काजोल, इब्राहिम आणि पृथ्वीराज सुकुमारनचा ‘सरजमीन’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केओझे इरानी यांनी केलं आहे. येत्या २५ जुलैला हा देशभक्तीवर आधारित असलेला सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे.
Sarzameen ki salamati se badhkar kuch nahi 🇮🇳#Sarzameen, releasing July 25, only on #JioHotstar#SarzameenOnJioHotstar@PrithviOfficial @itsKajolD #IbrahimAliKhan #KaranJohar @adarpoonawalla @apoorvamehta18 @AndhareAjit @kayoze @MARIJKEdeSOUZA @somenmishra0 @Soumil1212… pic.twitter.com/ZBRSn5v6Yf
— JioHotstar (@JioHotstar) June 30, 2025